छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक लड्डा यांच्या बंगल्यावरील दरोड्याचे प्रकरण

छत्रपती संभाजीनगर – येथील उद्योजक लड्डा यांच्या बंगल्यावरील दरोडाप्रकरणी नांदेड येथून सराफासह ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांकडून २० लाख रुपयांचे १९ तोळे ४ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे.आशिष बाकलीवाल, शेख शाहरूख शेख रफिक, शेख अबुजर उपाख्य शाहिद, शेख सोहेल शेख मुस्तफा अशी आरोपींची नावे आहेत. सोनेविक्रीसाठी गंगणे, खोतकर आणि हजबे यांनी परिचयातील अनेकांना कामाला लावले होते. त्यातील गंगणेचे सासरे आणि पत्नी यांना अटक झाली. गंगणेच्या गावातील शेख सोहेल यास खोतकर याने २० तोळे सोने दिले होते. त्याने सर्व सोने वितळवून त्याची लगड बनवली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे