‘आपण इस्लामी देश आहोत. तुम्ही भारतीय शिष्टमंडळाचे ऐकू नका !’, अशी केली होती मागणी !
कुआलालंपूर (मलेशिया) – भारतीय खासदारांची सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांत जाऊन पाकपुरस्कृत आतंकवाद आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांविषयी भारताची भूमिका सांगत आहेत. भारताचे एक शष्टमंडळ इस्लामी देश मलेशियामध्येही जाणार असतांना पाकने त्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘काश्मीरचा विषय संयुक्त राष्ट्रांत आहे. त्यामुळे भारतीय शिष्टमंडळाचे सर्व प्रस्तावित कार्यक्रम रहित करावेत’, अशी विनंती पाकिस्तानने मलेशियाकडे केली; पण मलेशियाने पाकिस्तानच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.
‘आपण इस्लामी देश आहोत. तुम्ही भारतीय शिष्टमंडळाचे ऐकू नका. मलेशियातील त्यांचे सर्व कार्यक्रम रहित करा’, असे पाकिस्तानी दूतावासाने मलेशियाच्या सरकारला सांगितले; पण सरकारने त्यांचे काही ऐकले नाही. सरकारने ९ सदस्यीय शिष्टमंडळाला सर्व १० प्रस्तावित कार्यक्रम आयोजित करण्याची अनुमती दिली.
संपादकीय भूमिका‘भारत-पाक यांच्यात शांतता आणि सौहार्द असले पाहिजे’, अशा दिवास्वप्नाचे उपदेशाचे डोस पाजणार्या भारतातील महाभागांना आता यावर काय म्हणायचे आहे ? ‘पाकिस्तान हा भारताकडे इस्लामचा शत्रू याच दृष्टीने पहातो’, हे या उदाहरणातून स्पष्ट होते. |

Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !