सावधगिरी बाळगण्याचे तज्ञांचे मत

नवी देहली – देशात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. २९ मे या दिवशी रुग्णांची संख्या १ सहस्र ३२६ वर पोहोचली आहे. त्याच वेळी मृतांची संख्या १४ झाली आहे. त्यांपैकी ६ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. लसीकरणाचा कोरानाच्या नवीन प्रकारावर (व्हेरियेंटवर) परिणाम होत नसल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
१. कानपूरमधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, वर्ष २०२२ नंतर कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे कोरोनाच्या रग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे; परंतु कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवलेली नाही. मला वाटते की, या वेळीही अधिक काळजी करण्याची आवश्यकता नाही.
२. बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे प्रा. ज्ञानेश्वर चौबे यांच्या मते, जर कोरानाची चौथी लाट आली, तर त्याचा परिणाम २१ ते २८ दिवसांपर्यंत राहील. ती दुसर्या लाटेसारखी घातक ठरणार नाही.
३. प्रा. ज्ञानेश्वर चौबे म्हणाले की, लसीकरण झालेल्या लोकांनीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे लसीकरण नवीन प्रकारच्या कोरोनाचे विषाणूंमुळे होणारे परिणाम रोखू शकत नाही. तथापि लसीकरणाची प्रतिकारशक्ती अजूनही पूर्णपणे कमकुवत झालेली नाही. ती निश्चितच तुमच्या शरिराला कोरोनाच्या नवीन प्रकाराशी लढण्यास साहाय्य करू शकते.
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Corona : आंध्रप्रदेशात २० दिवसांत आढळले कोरोनाचे १२ नवीन रुग्ण !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !