भरपावसात फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण – पाकिस्तानच्या विरोधातील ऑपरेशन सिंदूर राबवणार्या भारतीय लष्कराचे मनोबळ वाढवण्यासाठी चिपळूणकरांनी एका फेरीचे नियोजन केले होते. या फेरीत सायकल आणि दुचाकीस्वार सहभागी झाले होते. जोरदार पाऊस असतांनाही देशप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही फेरी काढली.
या फेरीत ध्वनीवर्धकावर देशभक्ती वाढवणारी गाणी लावण्यात आली होती. सहभागी झालेल्या नागरिकांनी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम् ।’, ‘हमसें जो टकरायेगा मिट्टीमें मिल जायेगा’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ यांसारख्या घोषणा दिल्या.
या फेरीत राजकीय पक्ष, चिपळूण सायकलिंग क्लब, विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांना मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. चिंचनाका बाजारपेठ, नाईकपूल, गोवळकोट रोड, श्री देवी करंजेश्वरी कमानीपासून, उक्ताड, भेंडीनाका, अर्बन बँक, जुना स्टँड आणि शेवटी इंदिरा गांधी केंद्र या मार्गावर ही फेरी काढण्यात आली.
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !