दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक सागर जावडेकर यांनी केली महोत्सवाच्या सिद्धतेची पहाणी !

डावीकडून प्रीतम नाचणकर, सागर जावडेकर, विक्रम डोंगरे आणि अभिजीत नाडकर्णी

फोंडा (सच्चिदानंद परब्रह्मनगरी), १५ मे (वार्ता.) – दैनिक ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीचे निवासी संपादक श्री. सागर जावडेकर यांनी १५ मे या दिवशी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव होत असलेल्या फर्मागुडी येथील अभियांत्रिकी मैदानावर येऊन सिद्धतेची पहाणी केली. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी त्यांना कार्यक्रमाविषयीची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाची सिद्धतेची पहाणी करून झाल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. सागर जावडेकर म्हणाले, ‘‘इतका भव्य-दिव्य कार्यक्रम गोवा येथे प्रथमच होत आहे. येथील व्यवस्था आणि नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे आहे. हा कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे कुंभमेळाच आहे. गोव्यातील सहस्रावधी धर्मप्रेमी हिंदू या कार्यक्रमात सहभागी होतील.’’ या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे उपसंपादक श्री. विक्रम डोंगरे, गोवा राज्यातील प्रतिनिधी श्री. अभिजीत नाडकर्णी, महाराष्ट्रातील प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर उपस्थित होते.