अहिल्यानगर येथे आयोजित रत्नशास्त्र कार्यशाळा !

अहिल्यानगर – कुंडली आणि रास यांचा बारकाईने अभ्यास करून रत्न घालण्यासाठी दिले असता रत्नांचा प्रभाव निश्चितपणे दिसून येतो. जीवनातील यशाचे मार्ग सुकर होतात, असे नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार ह.भ.प. मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले. ‘श्री सह्याद्री ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर’ आणि ‘श्रीराम ज्योतिष कार्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रोफेसर चौकामधील हॉटेल रोज गोल्ड (ब्रह्मभोज) मध्ये रत्न, ज्योतिष आणि वास्तू सल्लागार डॉ. गोपाळकृष्ण रत्नपारखी यांची रत्नशास्त्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषवतांना ते बोलत होते.

कार्यशाळेचा शुभारंभ गणेशपूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक प्रवीण उरणकर, ज्योतिषशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक विजय गीत (नाशिक) आणि हस्त सामुद्रिक शास्त्राचे अभ्यासक अशोक निंबाळकर उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी ‘श्रीराम ज्योतिष विद्यालया’च्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
ह.भ.प. मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले की, रत्नशास्त्र समजून घेण्यासाठी रत्नांची नेमकी पारख असलेल्या रत्नपारखी यांची कार्यशाळा, हेच या कार्यशाळेचे वेगळेपण आहे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. युवकांची उपस्थिती लक्षणीय आहे, हे कौतुकास्पद आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक