
खेड – रक्कम गुंतवल्यास अधिक परतावा देण्याचे आमीष दाखवून शहरातील एका तरुणीची ३ लाख १५ सहस्र रुपयांची ‘ऑनलाईन’ फसवणूक करण्यात आली. या घटनेत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अज्ञात व्यक्तीने तरुणीच्या भ्रमणभाषवर संपर्क साधून ‘घरबसल्या पैसे कमावता येतील’, असे आमीष दाखवले. त्यामुळे तरुणीने १५ सहस्र रुपये त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केले.

त्यानंतर तरुणीच्या खात्यात अधिक परताव्याची रक्कम जमा झाल्याने तिचा विश्वास बसला. यानंतर दुसर्या टप्यात अज्ञात व्यक्तीने तिच्या खात्यातून २ लाख १५ सहस्र रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतले आणि त्यावर संशयिताने अधिकचा परतावा दिला; मात्र तिसर्या टप्यात आणखी १ लाखाची गुंतवणूक केल्यानंतर परताव्याची अधिकची रक्कम येणे बंद झाले. त्यामुळे तरुणीने ‘त्या’ अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद न मिळाल्याने ‘ऑनलाईन’ फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात येताच तिला धक्का बसला.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !