Swatantrya Veer Savarkar Award : आज ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान सोहळा !

सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता पिता-पुत्र पू. हरि शंकर जैन आणि विष्णु शंकर जैन यांना पुरस्कार घोषित !

स्वातंत्र्यवीर सावरकर (डावीकडे) अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि पू. हरि शंकर जैन (उजवीकडे)

पिंपरी (जिल्हा पुणे) – येथील निगडी प्राधिकरणात असलेल्या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने २६ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६.३० वाजता  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान सोहळा होणार आहे. २६ फेब्रुवारी ही स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी ! याचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता पिता-पुत्र पू. हरि शंकर जैन आणि विष्णु शंकर जैन यांना प्रदान करून गौरवण्यात येईल, तर हिंदुत्वनिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मीरा अ. कडबे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार २०२५’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण ज्येष्ठ अधिवक्ता आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे.

१. पुरस्काराचे हे १७ वे वर्ष आहे.

२. हिंदुत्व आणि हिंदु धर्मासाठी अनेक वर्षांपासून कायदेशीर संघर्ष करणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना रुपये १ लाख अन् सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.

३. विदर्भ प्रांतात लव्ह जिहाद, कौटुंबिक हिंसाचार, तसेच नारी सुरक्षितता यांसाठी ३४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या मीरा अ. कडबे यांना रुपये ५१ सहस्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे.

४. या गौरव सोहळ्याला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळा’चे अध्यक्ष विश्‍वनाथन् नायर यांनी केले आहे.