चुकीचे आरोप करणार्या महिलेला कठोर शिक्षा होणे आवश्यक !

सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती पू. नंदगिरी महाराज यांच्यावर सोळशी येथील महिलेने विनयभंगाची तक्रार प्रविष्ट केली होती. या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.
१७ सप्टेंबर २०१९ या दिवशी पीडित महिलेच्या २ मुलींचे पू. नंदगिरी महाराज यांच्या मुलीसोबत भांडण झाले. भांडण आपापसात मिटवून घेण्यास सांगण्यासाठी पीडित महिला पू. महाराजांकडे आली होती. त्यांनी तिचा हात धरून ‘मी भांडण मिटवून घेणार नाही, तसेच मी सांगेन तशी वागलीस, तर भांडण मिटवून घेईन’, असे म्हटले. पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, अशी तक्रार पीडित महिलेने दिली होती. अन्वेषण करून पोलिसांनी महाराजांवर न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. कोरेगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने ४ साक्षीदार पडताळण्यात आले. अधिवक्ता किशोर खराडे यांनी महाराजांच्या वतीने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून पू. महाराजांची निर्दोष मुक्तता केली.