कोंढवा (पुणे) येथे लूटमार करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – कोंढव्‍यामध्‍ये छर्‍याच्‍या बंदुकीचा धाक दाखवून उपाहारगृहामध्‍ये आचार्‍याचे काम करणार्‍या तरुणास लुटणार्‍या तबरेज उपाख्‍य परवेज शेख, रमजान पटेल यांना अटक करण्‍यात आली आहे. पीडित तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

तक्रारदार तरुण पहाटे ४ वाजता कामावर निघाला होता. एन्.आय.बी.एम्. रस्‍त्‍यावरील ‘मौर्य हौसिंग सोसायटी’समोर आरोपींनी त्‍याला अडवले. छर्‍याच्‍या बंदुकीचा धाक दाखवला. तरुण आणि आरोपी यांमध्‍ये झटापट झाली. त्‍यामध्‍ये चोरांनी तरुणाचा भ्रमणभाष चोरून नेला, तर तरुणाने ती छर्‍याची बंदूक हस्‍तगत केली. पोलिसांकडे तक्रार प्रविष्‍ट केल्‍यानंतर पोलिसांनी सीसीटीव्‍ही चित्रीकरण पाहून चोरांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका :

अल्‍पसंख्‍यांक असणारे धर्मांध गुन्‍हेगारीमध्‍ये मात्र अव्‍वल आहेत !