यु ट्यूबर कमाल खानची मानहानीकारक गरळओक !
(यु ट्यूबर म्हणजे यु ट्यूबवर व्हिडिओ सिद्ध करून प्रसारित करणारा)
पुणे – स्वत:ला ‘केआर्के’ म्हणवणारा यु ट्यूबर असलेल्या कमाल खान याने स्वत:च्या यु ट्यूब व्हिडिओमधून छावा चित्रपटाचे परीक्षण करतांना औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘छावा’ चित्रपट नुकताच प्रसारित झाला आहे. त्यामध्ये ‘महाराजांच्या शेवटच्या काळातील यातना आणि दृश्ये दाखवणे म्हणजे चित्रपटाची वेळ वाढवण्यासाठी केलेला प्रकार असल्या’चे हिंदुद्वेषी वक्तव्य यु ट्यूबर खान याने केले असून स्वत:च्या १२ मिनिटांच्या व्हिडिओत छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत अपमानही केला आहे. त्यामुळे सध्या सामाजिक माध्यमांतून संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया नोंदवून यु ट्यूबरवर पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक प्रसंग साकारले असून औरंगजेबाने त्यांचा शेवटच्या काळात केलेला अनन्वित छळ, अवहेलना यांचेही चित्रण दाखवले आहे. मोगल बादशहा औरंगजेबाचा हा काळा इतिहास महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राष्ट्रप्रेमीला माहीत झाला आहे; मात्र इतिहासात असे काहीही लिहिले नसल्याचे तारे कमाल खानने व्हिडिओत तोडले आहे. याशिवाय त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करून भारतियांच्या राष्ट्रप्रेमी भावना डिवचण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकारही केला आहे.
कमाल खानने यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केलेली असून त्याच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ केल्याचे बोलले जात आहे. (पोलिसांनी आधीच कमाल खान याच्यावर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा असे बेताल वक्तव्य करण्याचे धाडस त्याने केले नसते. – संपादक) समाजात फूट पाडण्याचा हा प्रकार काही राष्ट्रद्रोही शक्ती किंवा राजकारणी जाणीवपूर्वक करत तर नाहीतना ? असा प्रश्न लोक विचारत आहेत.
संपादकीय भूमिका :मुसलमानांच्या सत्पुरुषांच्या संदर्भात असे मानहानीकारक वक्तव्य कुणी केले असते, तर तात्काळ त्याचे ‘सर तन से जुदा’ झाले असते ! अशा प्रकारचे विधान हे हिंदूंच्या भावनांना पायदळी तुडवण्यासारखेच आहे. |