औरंगजेबाचे फलक झळकावल्याचे प्रकरण

जळगाव – तांबापूर, जळगाव येथे मुसलमानांनी काढलेल्या संदल (धार्मिक मिरवणूक) मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबाचे फलक झळकावण्यात आले होते. त्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानुसार अश्रफ शेख शकील, शेख मुजाहिद शेख जाकीर आणि डॉल्बी मालक योगेश कोळी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शहरातील तांबापूर भागातून काढण्यात आलेल्या संदलमध्ये हेतूपुरस्सर औरंगजेबाचे फलक झळकावण्यात आले होते, तसेच एम्.आय.एम्.चे अकबरुद्दीन ओवैसी यांच्या भाषणातील १५ मिनिटांचे आव्हान देणारा चिथावणीखोर भाग डॉल्बीवरून वाजवण्यात आला होता. याविषयी हिंदु समाजातून आक्षेप घेण्यात आला होता. धर्मवीर शंभूराजे यांची क्रूर हत्या करणार्या औरंगजेबाचे उदात्तीकरण जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न चुकीचा असून यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविषयी प्रत्यक्षदर्शी आणि हिंदुत्ववादी यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.