|

प्रयागराज, २३ जानेवारी (वार्ता.) – आमच्या सनातन धर्मियांना कुणीही वेगळे करू शकत नाही. आम्ही संघटित होतो आणि पुढेही राहू. आम्ही सर्व सनातनींच्या हितासाठी एकतेची शपथ घेतली आहे. महाकुंभामध्ये २७ जानेवारी या दिवशी ‘धर्म संसद’ आयोजित केली आहे. केंद्र सरकारकडे सनातन बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केली आहे. या बोर्डाची रूपरेषा सिद्ध असून यावर धर्म संसदेत निर्णय घेतला जाईल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही सरकारकडून सनातन बोर्डाची स्थापना करवून घेणार आहे. या धर्मसंसदेत देशातील साधू-संत, शंकराचार्य आणि १३ आखाड्यांतील प्रमुख सहभागी होतील. सर्व सनातन धर्मियांना संघटित करणे, हा या धर्मसंसदेचा उद्देश आहे, अशी माहिती प्रसिद्ध कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर यांनी २३ जानेवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
It is essential to establish a Sanatan Board. Under any circumstances, we will ensure the establishment of the Sanatan Board by the Central govt! – Renowned Kathavachak @DN_Thakur_Ji
A ‘Dharma Sansad’ is being organized on January 27 at the Mahakumbh.#SanatanPrabhatAtKumbh pic.twitter.com/FIs7s1II8T
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 23, 2025
१. कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर म्हणाले, ‘‘सनातन धर्माशी संबंधित स्थळांचे संरक्षण आणि सशक्तीकरण करण्यासाठी ‘सनातन बोर्ड स्थापन’ करणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण सनातनी समाजासाठी हा बोर्ड उपयोगी ठरेल.
२. वक्फ बोर्डाच्या ९ ते १० लाख एकर भूमीविषयी प्रश्न उपस्थित करून अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी महाराज म्हणाले, ‘‘मंदिरे आणि मठ यांच्या भूमींवर अतिक्रमण होत आहे आणि आम्ही ते कोणत्याही परिस्थिती सहन करणार नाही. याच अनुषंगाने सनातन बोर्ड स्थापन करणे आवश्यक वाटू लागले आहे. सनातन बोर्डाचा प्रारूप सिद्ध झाले आहे; मात्र यासाठी मंदिरे, मठ आणि संत यांची सहमती घेतली जाईल. धार्मिक स्थळांना सशक्त करणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.’’
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena