लातूर जिल्ह्यातील तळेगावातील ७५ टक्के भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

१०३ शेतकर्‍यांना वक्फ बोर्डाच्या नोटिसा !

लातूर – अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील ७५ टक्के भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. गावातील १०३ शेतकर्‍यांच्या ३०० एकर भूमीवर ‘महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबाद’च्या न्यायालयाने वक्फ याचिका क्रमांक १७/२०२४ अन्वये हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित शेतकर्‍यांना याद्वारे बजावण्यात आलेल्या नोटिसींमध्ये वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरित्या तळेगावातील १०३ शेतकर्‍यांना वक्फ बोर्डाच्या नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. सर्व शेतकर्‍यांनी एकत्रितपणे नोटिसला अधिवक्त्यांच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. (वक्फ बोर्डाचे धोके लक्षात घेऊन तो विसर्जित होईपर्यंत हिंदूंनी एकजुटीने लढा देणे आवश्यक ! – संपादक)

तळेगावातील प्रत्येक शेतकरी शेती आणि मोलमजुरी करून कुटुंब चालवत आहे. ‘भूमी कह्यातून गेल्यास कसे होणार ?’, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. शंभर-दीडशे वर्षांनंतर वक्फ बोर्डाने या भूमीवर दावा केल्याने शेतकर्‍यांसाठी हा मोठा धक्का आहे. यासंदर्भात २० डिसेंबरला सुनावणी होणार आहे. ‘या प्रकरणी शासनाने न्याय मिळवून द्यावा’, अशी गावातील शेतकर्‍यांनी मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वक्फ बोर्डाला ताळ्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारने वक्फ कायदा रहित करून हे बोर्ड विसर्जित करणे आवश्यक !