‘१८.७.२०२४ या दिवशी रात्री १०.३० वाजता माझा डावा गुडघा पुष्कळ दुखत होता. मला दुसर्या दिवशी सकाळी उठता येत नव्हते. तेव्हा मी संबंधित साधकांना विचारून नामजपादी उपाय आणि औषधोपचार केले. नंतर मला बरेे वाटू लागले.
२१.७.२०२४ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मला पुन्हा त्रास होऊ लागला. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावर १ घंटा नामजपादी उपाय केल्यावर मला होत असलेला त्रास दूर झाला. तेव्हा बैठक व्यवस्थेची सेवा करतांना मला थकवा जाणवला नाही.
गुरुपौर्णिमेनंतर २ दिवसांनी मी वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्यात मला डेंग्यू झाला असल्याचे आढळले. आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘डेंग्यू झाल्यावर शरिरातील रक्तातील पेशींचे प्रमाण न्यून होते. अशा व्यक्तीला पुष्कळ थकवा येतो; मात्र तुम्ही चालत आलात.’’
आधुनिक वैद्यांचे बोलणे ऐकल्यावर ‘गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला सेवेच्या माध्यमातून शक्ती दिली’, असे वाटले. माझी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. अविनाश अरुण देसले, भोसरी, पुणे. (१४.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |