पू. (सौ.) अश्‍विनीताई, तुम्‍हीच आहात आमच्‍या आई ।

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

पू. ताई, तुम्‍हीच आहात आमच्‍या आई (टीप १) ।
कसे बरे होऊ आम्‍ही
तुमचे उतराई ॥ १ ॥

सेवेतील सखोलता
तुम्‍ही शिकवली आम्‍हा ।
नियोजनातील आमच्‍या
त्रुटींचा अभ्‍यास तुम्‍ही केला ॥ २ ॥

सौ. प्रज्ञा जोशी

बारकाव्‍यानिशी सेवेची आमच्‍या घडी बसवली तुम्‍ही ।
सेवेतून आमच्‍या साधनेची जडणघडण हो झाली ॥ ३ ॥

प्रत्‍येक क्षणाचा साधनेसाठी उपयोग व्‍हावा ।
आपल्‍यासम आमचाही क्षणमोती अनमोल व्‍हावा ॥ ४ ॥

सत्‍संग (टीप २) म्‍हणजे जणू स्‍वभावदोष-अहंचे समुद्रमंथन ।
हाती देता आमच्‍या गुणवृद्धीचा अमृतकलश ॥ ५ ॥

स्‍वभावदोष-अहं काढता कठोरतेने आमचे ।
होई प्रक्रिया अन् शुद्धी या अशुद्ध मनांची ॥ ६ ॥

तळमळ साधनेची आमच्‍यापेक्षा आपलीच अधिक ।
न्‍यून पडतो आम्‍ही, आहोत आपले क्षमायाचक ॥ ७ ॥

केवळ दर्शनानेही देता आम्‍हा भावानंद ।
प्रीतीमय कृपावत्‍सल श्री लक्ष्मीचे तुम्‍ही रूप ॥ ८ ॥

कितीही लिहिले, तरी मर्यादा असे शब्‍दांना ।
आईविषयी असे मनी केवळ कृतज्ञता ॥ ९ ॥

आम्‍हा लेकरांवर तुमची कृपादृष्‍टी रहावी ।
कृतज्ञतारूपी पुष्‍पे तुमच्‍या चरणी वहावी ॥ १० ॥

टीप १ : आध्‍यात्मिक आई

टीप २ : चुकांची जाणीव होण्‍यासाठी घेण्‍यात येणारा सत्‍संग

– सौ. प्रज्ञा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक