आत्म्याला ‘आनंदमय’ का म्हणतात ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती

मनुष्य गाढ झोपेतून उठला की, आनंदी, उत्साही असतो. त्याचा सर्व दिवस चांगला जातो. गाढ झोप लागली नसेल, तर माणूस त्रासिक, चिडचिडा असा रहातो. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन वा बुद्धी यांतील कोणतेही साधन या निद्रेच्या आनंदासाठी लागत नाही. हा आनंद निरूपाधिक, कोणत्याही विषयाची अपेक्षा नसलेला स्वयंभू आणि स्वाभाविक असा आहे. म्हणून या आत्म्याला ‘आनंदमय’ असे म्हटले आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘मांडूक्योपनिषद्’)