मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे आंदोलन

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंच्या मंदिरात प्रसादाच्या लाडूंत चरबीचे तेल मिसळणे, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. ज्यांचा या गोष्टीत सहभाग आहे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मलकापूर येथे २५ सप्टेंबर या दिवशी शिवतीर्थ येथे आंदोलन करण्यात आले. (कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून तत्परतेने कारवाई केव्हा करणार ? – संपादक) याप्रसंगी महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराज काटकर, कोल्हापूर जिल्हा मंदिर महासंघ समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, माजी नगरसेवक श्री. महेश कोठावळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ आणि श्री. चारुदत्त पोतदार यांसह अन्य उपस्थित होते.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !