‘मी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात सहभागी झाल्यानंतर मला नामजपाचे महत्त्व कळले. वर्गात सांगितल्याप्रमाणे मी प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करते आणि धार्मिक कृती करते. त्यामुळे माझ्या घरातील सदस्यांच्या स्वभावात बरेच पालट झाले आहेत. माझे घरच्या कामाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाणे घरच्यांना आवडत नव्हते; मात्र धर्मशिक्षणवर्गाला जाण्यासाठी मला घरच्यांकडून चांगले प्रोत्साहन मिळत आहे. माझी चिडचिड न्यून झाली आहे. माझ्या मुलींवरही चांगले संस्कार होत आहेत. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यात झालेल्या या पालटांबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. हर्षाली अतुल दाभाडकर, दिग्रस, यवतमाळ.
(१०.८.२०२४)