Buxar Weapons Factory : बक्‍सर (बिहार) येथे निवृत्त शिक्षकाच्‍या घरात चालणारा शस्‍त्रनिर्मितीचा कारखाना उघड

शिक्षक आणि ६ मुसलमान यांना अटक

जप्‍त करण्‍यात आलेले साहित्य

बक्‍सर (बिहार) – जिल्‍ह्यातील चांद गावामध्‍ये पोलिसांनी निवृत्त शिक्षक वीरेंद्रकुमार श्रीवास्‍तव यांच्‍या घरावर धाड टाकून तेथे चालणारा शस्‍त्रनिर्मितीचा कारखाना उघड केला. या घरातून पिस्‍तूल, बंदूके बनवण्‍यासाठी लागणारे साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले. या प्रकरणी पोलिसांनी श्रीवास्‍तव यांच्‍यासह पिंटू शाह, महंमद आझाद, महंमद मोनू, महंमद अब्‍दुल, महंमद राजू आणि महंमद हिब्रू यांना अटक केली आहे. यातील ५ जण मुंगेर जिल्‍ह्यात रहाणार आहेत. काही मासांपूर्वीच ते येथे रहाण्‍यासाठी आले होते. ते पूर्वी कुठे शस्‍त्रे बनवत होते, याचा शोध घेतला जाणार आहे. तसेच त्‍यांचा कोणताही टोळीशी संबंध आहे का ? याचीही चौकशी केली जाणार आहे.

संपादकीय भूमिका

अशांना फाशीची शिक्षा करा !