धर्माचरणाची आवड असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. नारायण कैलास व्यास (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. नारायण व्यास हा या पिढीतील एक आहे !

‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. नारायण कैलास व्यास उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५४ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२४.७.२०२४)

कु. नारायण कैलास व्यास
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. नारायण कैलास व्यास याची त्याच्या आईला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. ‘कु. नारायण नेहमी उत्साही आणि आनंदी असतो.

सौ. सुनीता व्यास

२. तो घरातील प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवतो.

३. समंजस

नारायण लहान असल्यापासून मला त्याचा कोणताही त्रास झाला नाही.

४. प्रेमभाव

अ. मी कार्यालयातून घरी आल्यावर तो लगेच मला पिण्यासाठी पाणी आणून देतो. तो मला ‘‘भोजन झाले का’’, असे विचारतो. तेव्हा ‘त्याच्या माध्यमातून श्रीकृष्णच विचारत आहे’, असे मला अनुभवता येते.

आ. आमच्या घरी साधक आल्यावर तो साधकांना पिण्यासाठी पाणी देतो. तो साधकांना ‘भोजन करणार का ?’, असे विचारतो.

इ. मी कार्यालयात गेल्यावर तो त्याच्या वडिलांना (श्री. कैलास व्यास यांना) जेवण वाढून देतो.

ई. त्याचे वडील थकले असल्यास तो त्यांचे पाय दाबून देतो. त्याला सर्वांची सेवा करायला पुष्कळ आवडते.

५. धर्माचरणाची आवड

नारायण शाळेत जायच्या आधी आमच्या गोठ्यातील गायीला नमस्कार करतो. तो कपाळाला टिळा लावून बाहेर जातो. तो त्याच्या मोठ्या  भावाला (कु. राम व्यास याला, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) कपाळाला टिळा लावण्याची आठवण करून देतो. तो दादाला (मोठ्या भावाला) सांगतो, ‘‘दादा, तू प्रतिदिन टिळा लाव. गुरुदेव तुझ्याकडे बघत आहेत.’’ नारायणला सात्त्विक कपडे घालायला आवडतात. त्याच्याकडे पाहून मला श्रीकृष्णाची आठवण होते.

६. देवाची आवड

त्याला देवतेचे चित्र काढायला आवडते.

७. साधनेची आवड

त्याला साधना करायला आवडते. तो अन्न ग्रहण करण्यापूर्वी, तसेच झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो.

८. चुकांविषयी संवेदनशील

त्याच्याकडून चूक झाल्यास तो लगेच क्षमायाचना करतो. माझ्याकडून चूक झाल्यास तो मला सांगतो.

९. संतांप्रती भाव

एकदा त्याला सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सत्संग लाभला. नंतर त्याने मला सांगितले, ‘‘सद्गुरु जाधवकाका किती छान दिसतात ! ते हनुमंतासारखे तेजस्वी दिसत होते. मला त्यांना भेटल्यावर पुष्कळ आनंद होतो.’’

१०. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती भाव

अ. तो प्रतिदिन गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) छायाचित्राला साष्टांग दंडवत घालतो. त्याची गुरुमाऊलींवर अपार श्रद्धा आहे. तो आईला म्हणतो, ‘‘गुरुमाऊली श्रीकृष्णासम दिसतात.’’

आ. एकदा मला सेवा करून घरी यायला उशीर झाला. तेव्हा माझा मोठा मुलगा (राम) चिडचिड करत होता. तेव्हा नारायण रामला सांगत होता, ‘‘आई गुरुदेवांच्या समष्टी कार्यात सहभागी होते. गुरुमाऊली आपल्यासाठी किती करतात ! आई सेवा करते. तिला बोलू नको.’’ तेव्हा त्याचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली. माझी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. गुरुमाऊली, ‘या सात्त्विक बालकांच्या माध्यमातून मला प्रत्येक सूत्र शिकायला मिळते आणि भावाश्रू येतात.’

११. नारायणचे स्वभावदोष

१. हट्टीपणा, २. गांभीर्याचा अभाव, ३. ऐकण्याची वृत्ती नसणे, ४. अधिकारवाणीने बोलणे’

– सौ. सुनीता व्यास, चोपडा, जळगाव. (१४.५.२०२३)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.