Ganja Chocolates Seized : तेलंगाणा येथे एका दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या चॉकलेटमध्ये आढळला गांजा !

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणातीला सायबराबाद पोलिसांनी भाग्यनगर येथील एका दुकानातून गांजा असणारे चॉकलेट जप्त केले. हे चॉकलेट आकर्षक वेष्टनासह आयुर्वेदिक औषधाच्या नावाने विकले जात होते.

उत्तरप्रदेशात हे चॉकलेट बनवण्यात आले आहे. याच्या वेष्टनावर लिहिल्याप्रमाणे १०० ग्राम चॉकलेटमध्ये १४ गॅम गांजा वापरण्यात आला आहे. पोलिसांनी या दुकानातून २०० पाकिटे जप्त केली आहेत. दुकान चालवणारी पांडे नावाची व्यक्ती उत्तरप्रदेशातील आहे. या पॅकेटवर लिहिले आहे की, अपचन आणि पोटासंबंधित आजार यांवर २ वेळा पाण्यासमवेत घेऊ शकता.

तेलंगाणा अमली पदार्थ विरोधी विभागाने उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये गांजायुक्त चॉकलेट बनवणार्‍या अनेकांची ओळख पटवली आहे.