कोल्हापूर येथील ‘हिंदु धर्म परिषदे’त धर्मरक्षणार्थ १ सहस्र हिंदूंनी घेतली शपथ !
कोल्हापूर, १७ ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगडावर हिंदूंचा उद्रेक झाल्यावर काही राजकीय लोकांना अल्पसंख्यांकांचा पुळका आला आणि ते तात्काळ त्यांना साहाय्य करण्यासाठी गडावर गेले. याउलट कोल्हापूर शहरात सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावर धर्मांधांनी त्यांच्या बसवर दगडफेक केली. तेव्हा त्या हिंदु विद्यार्थ्यांना साहाय्य करण्यासाठी कुणी गेले नाही. चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हिंदु संस्कृतीवर आघात होत आहेत. हिंदूंना शैक्षणिक स्तरावर धर्मशिक्षण दिले जात नाही. या कार्यक्रमाचे आयोजन होणे हे हिंदु समाज जागृत होत असल्याचे द्योतक होय. अशाच प्रकारे हिंदूंनी हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात एकवटले पाहिजे. पुढील काळात हिंदु आणि हिंदु धर्म यांवर आघात होत असतील, तर ते सहन करणार नाही, तसेच हिंदूंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशी चेतावणी भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी दिली. ते १७ ऑगस्टला शाहू स्मारक येथे झालेल्या हिंदु धर्म परिषदेत बोलत होते.
या प्रसंगी प.पू. संतोष उपाख्य बाळ महाराज यांनीही उपस्थितांचे दिशादर्शन केले. तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आणि आजचे वास्तव’ या विषयावर प्रा. राजेंद्र ठाकूर यांनी, ‘हिंदु धर्मावर होणारे विविध आघात आणि लव्ह जिहाद’ या विषयावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी, तर शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर आदी मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.
देव, देश आणि धर्म यांच्या हितासाठी मांडण्यात आलेल्या १५ ठरावांना परिषदेला उपस्थित १ सहस्रहून अधिक हिंदु धर्मप्रेमींनी अनुमोदन दिले. तसेच त्यांनी धर्मरक्षणाची शपथही घेतली. परिषदेची प्रस्तावना श्री. अंकुश निपाणीकर यांनी केली, तर हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर यांनी परिषदेचा उद्देश सांगितला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत यांनी सूत्रसंचालन केले.
उपस्थित संघटना आणि पक्षहिंदु एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराज प्रतिष्ठान, विश्व हिंदु परिषद, हिंदु महासभा, मराठा तितुका मेळवावा संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, अखिल भारतीय हिंदू महासभा, आंतरराष्ट्रीय विश्व हिंदु परिषद, हिंदु युवा प्रतिष्ठान, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती कृती समिती, भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांसह विविध तरुण मंडळे आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. |
कोल्हापूर येथे हिंदु धर्म परिषदेत मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केले जाज्वल्य विचार !
रामनाथी (गोवा) येथे जून २०२४ मध्ये झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील संत आणि मान्यवर वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन ‘हिंदु धर्म परिषदे’त प्रारंभी दाखवण्यात आले, तसेच या परिषदेच्या निमित्ताने विशेष पद्धतीने सिद्ध केलेला लघुपट (डॉक्युमेंट्री) दाखवण्यात आला.
हे पुरोगामी कोल्हापूर नसून हिंदुत्वनिष्ठ कोल्हापूर आहे ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप
कोल्हापूर शहर हे आजयर्पंत पुरोगामी आहे, असे सांगितले जात होते; मात्र कोल्हापूर हे पुरोगामी नसून ते हिंदुत्वनिष्ठ आहे, असे आपण ठामपणे सांगितले पाहिजे.
We will never tolerate attacks on Hindus! – @dbmahadik, BJP MP
Resolution for the welfare of the Nation and Dharma at the ‘Hindu Dharma Parishad’ in Kolhapur.
Over 1,000 Hindus take an oath to protect their religion. pic.twitter.com/FWWs2hZUBW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 17, 2024
हिंदूंच्या राजकीय लोकप्रतिनिधींनी ठामपणे ‘आम्ही हिंदू आहोत’, अशी भूमिका घेण्याची आवश्यकता ! – प.पू. सद्गुरु उपाख्य बाळ महाराज
हिंदूंचे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आता ठामपणे ‘आम्ही हिंदु आहोत’, अशी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. लोकशाही प्रक्रियेत ‘जो हिंदूंचा आहे त्यालाच हिंदूंचे मत’, अशी भूमिका हिंदूंनी घेण्याची वेळ आली आहे. हिंदु धर्म हा लाखो वर्षे प्राचीन असून महाराष्ट्रातील संत रामदासस्वामी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे समाजावर अनंत उपकार आहेत. हिंदूंनी यापुढील काळात ‘कोणतीही वस्तू हिंदूंकडूनच विकत घेणार’, असा निर्धार केला पाहिजे.
हिंदूंनी आता ‘राजकीय जिहाद’ला प्रत्युत्तर देण्याची सिद्धता ठेवायला हवी ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन महामंडळ
‘लव्ह जिहाद’, ‘भूमी जिहाद’ यांसह अन्य अशा अनेक जिहादांसमवेत ‘राजकीय जिहाद’ चालू झाला आहे. या ‘राजकीय जिहादा’ला हिंदूंनी प्रत्युत्तर देण्याची सिद्धता ठेवली पाहिजे. जे पक्ष हिंदूंच्या हिताचा विचार करतात त्यांच्या पाठीशी हिंदूंनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यासाठी लहानपणापासून ‘बालसंस्कार’ दिले पाहिजेत, तसेच ‘आई संस्कार’ही देण्याची आज वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांना सांगून लवकरच ‘लव्ह जिहाद ’विरोधी कायदा महाराष्ट्रात संमत करू, तसेच यापुढील काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावे, यांसाठी प्रयत्न करू.
तरुणांना इतर शिक्षणासमवेत सक्तीचे सैन्य शिक्षण द्यावे ! – प्रा. राजेंद्र ठाकूर, अभ्यासक, स्वातंत्र्यवीर सावरकर
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आणि आजचे वास्तव’ या विषयावर बोलतांना प्रा. राजेंद्र ठाकूर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘हिंदुत्व’ नावाच्या लिहिलेल्या ग्रंथाला आज १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. ३७० कलम काढले, श्रीराममंदिर बांधले, आता आपणाला अखंड भारत करायचा असल्याने देशात ‘समान नागरी कायदा’ झालाच पाहिजे. तरुणांना इतर शिक्षणासमवेत सक्तीचे सैन्य शिक्षण दिले पाहिजे. सर्वप्रथम सावरकर आणि पू. डॉ. हेडगेवार यांनी हिंदु राष्ट्राची उद्घोषणा केली होती. सावरकरांचे हिंदुत्व गुळगुळीत नाही, तर कणखर आहे. हिंदु राष्ट्रासाठी सर्वांनी २४ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे.
अल्पसंख्यांकांच्या विरोधात हिंदूंची वज्रमूठ सिद्ध झाली पाहिजे ! – गजानन तोडकर, शहराध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन
हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर ‘हिंदु धर्म परिषदे’चा उद्देश सांगतांना म्हणाले की, हिंदु धर्म, देव आणि देश यांच्यावर प्रतिदिन अन्याय होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ‘हिंदु धर्म परिषद’ घेण्यात येणार आहे. याचा प्रारंभ पश्चिम महाराष्ट्रातून झाला आहे. देशात अल्पसंख्यांक मतांच्या जोरावर हिंदूंना वाकवतात. त्यामुळे याचा विचार करून हिंदूंची वज्रमूठ सिद्ध झाली पाहिजे. जिथे बुरखाधारी जन्म घेणार, तेथे ताराराणीचा जन्म होईल. देशात अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा वाढला आहे. त्यांच्याकडून हिंदूंवर सतत अन्याय होत आहे. निधर्मी लोक केवळ मतांसाठी अल्पसंख्यांकांची बाजू घेत आहेत. आम्हीही हिंदूंच्या रक्षणासाठी एकगठ्ठा मते (व्होट बँक) सिद्ध करू.
हिंदु मुलींकडून धर्माचरण करवून न घेतल्याने त्या ‘लव्ह जिहाद’मध्ये फसतात ! – सद्गुरु स्वाती खाडये
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या की, ‘लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि हलाल जिहाद’ची समस्या ही केवळ आपल्या देशातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावरील समस्या आहे. ‘केरला स्टोरी’ या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’ची भयानकता दाखवण्यात आली आहे. अश्लील वेबसीरिज, बॉलीवूडचे चित्रपट आणि दूरदर्शनवरील काही मालिका ‘लव्ह जिहाद’ला कारणीभूत आहेत. ज्यामध्ये मुसलमान अभिनेता आणि हिंदु अभिनेत्री यांचे प्रेमप्रसंग, विवाह, प्रणय प्रसंग आदी दाखवून समाजात ‘लव्ह जिहाद’चा एकप्रकारे प्रसार केला जात आहे. आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींना आपली संस्कृती आणि परंपरा यांचे महत्त्व सांगितले जात नाही. त्यांच्याकडून धर्माचरण करवून घेतले जात नाही. त्यामुळे अशा मुली मोठ्या झाल्यावर यात फसतात.
१. हिंदु धर्म परिषदेत मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी हिंदु जनजागृती समिती निर्मित ‘लव्ह जिहाद ?’ आणि ‘हलाल जिहाद ?’ हे ग्रंथ दाखवून ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ यांच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन केले.
२. कॉन्व्हेंट शाळांमधील मुले शिकून बाहेर पडल्यावर ते देव आणि धर्म मानायला सिद्ध नसतात. पक्के ‘सेक्युलर’ बनण्याच्या प्रकियेत असतात. त्यामुळे मुलांना मराठी शाळेतून शिक्षण द्यावे, असे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितले. |
क्षणचित्रे…
१. हिंदु धर्म परिषदेच्या बाहेर कागल येथील ‘जय श्रीराम’ ध्वज हलगी पथका’तील लहान मुलांनी आकर्षक ध्वज आणि हलगी यांची प्रात्यक्षिके दाखवली, तसेच ‘शांतीदूत मर्दानी आखाडा पथकातील’ युवकांनी मर्दानी खेळ दाखवून उपस्थितांची मने जिंकली !
२. हिंदु धर्म परिषदेला येणार्या प्रत्येक हिंदूला ‘गर्व से कहो हम हिंदू है’, अशा टोप्या देण्यात आल्या !
३. येणार्या हिंदूंचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात येत होते.
४. शहरात ठिकठिकाणी हिंदु धर्म परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन करणारी होर्डिंग लावण्यात आली होती.
५. हिंदु धर्म परिषदेत सर्व हिंदुत्वनिष्ठांनी भगव्या टोप्या आणि वस्त्रे परिधान केली होती.
उपस्थित संघटना आणि पक्षसकल हिंदु समाजाचे श्री. अभिजीत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सुजितभाऊ चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव आणि शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, मराठा तितुका मेळवावा संघटनेचे श्री. योगेश केरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, भाजपचे श्री. महेश जाधव, राहुल चिकोडे, भाजपचे माजी नगरसेवक श्री. सत्यजित (नाना) कदम, अखिल भारतीय हिंदु महासभा जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासने, ‘हिंदु युवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. अशोक देसाई, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री स्वप्नील पार्टे, प्रसन्न शिंदे, अर्जुन आंबी, शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी, सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. |
हिंदु धर्म परिषदेतील ठराव…१. सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्याची कार्यवाही करून मशिदींवरील अनधिकृत भोंगे त्वरित बंद करून ते काढण्यात यावेत. २. गोरक्षक संरक्षण कायदा असल्याने गोरक्षकांवर कारवाई न करता गोरक्षक संरक्षण कायद्याची कठोरपणे कार्यवाही करावी. ३. हिंदु धर्म, तसेच स्त्री संरक्षणाच्या दृष्टीने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा. ४. विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या आंदोलनात अनेक शिवभक्तांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. ५. हिंदुत्वाचे कार्य करणार्या कार्यकर्त्यांना आतंकवादी म्हणणारे खासदार शाहू महाराज, ‘सनातन धर्म देशाला लागलेली कीड आहे’, असे म्हणणारे जितेंद्र आव्हाड, भर संसदेत ‘पॅलेस्टाईन जिंदाबाद’ म्हणणारे असुदुद्दीन ओवैसी, तसेच भारताच्या पंतप्रधानांना देशातून पळवून लावण्याची भाषा करणारे राजू शेट्टी यांच्यावर कठोर कारवाई करावी. ६. वक्फ बोर्ड कायदा त्वरित विसर्जित करण्यात यावा. ७. धर्मांतरबंदी कायद्यात सुधारणा करून धर्मांतरासाठी प्रसार करणार्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच धर्मातरबंदी कायदा लागू करावा. ८. अनधिकृत मशिदी आणि मदरसे त्वरित नेस्तनाबूत करावेत. ९. सामाजिक माध्यमांवर जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट ठेवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी. १०. बांगलादेशी आणि रोहिग्या यांची अनधिकृत घुसखोरी त्वरित रोखावी. ११. ‘हलाल प्रमाणपत्र’ उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातूनही हद्दपार करण्यात यावे. १२. ज्या व्यक्तीने एकाहून अधिक विवाह केले आहे अथवा ज्या दांपत्याला दोनहून अधिक अपत्य आहेत, अशांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळू नये. |