पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांनी केलेले नामजपादी उपाय अन् त्याचे झालेले परिणाम

पू. (श्रीमती) निर्मला दाते

‘१३.६.२०२४ या दिवशी प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि साधक यांनी पू. दातेआजी यांच्यासाठी उपाय, प्रयोग, न्यास आणि नामजप केले. त्याची माहिती पुढील सारणीत दिली आहे.

रुग्णाईत अवस्थेतील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी 
वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

अन्य सूत्रे

१. प.पू. डॉक्टर पू. आजींना म्हणाले, ‘‘तुमच्यावर सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे मला काही काळजी नाही.’’

२. डॉ. नरेंद्र दाते आणि प.पू. डॉक्टर यांच्यातील संभाषण

डॉ. नरेंद्र दाते : पू. आजींच्या मनात काही इच्छा राहिली आहे; म्हणून त्यांना देह सोडायचा नाही का ?

प.पू. डॉक्टर : पू . आजींच्या मनात इच्छा असे काही नाही. त्या संत असून आनंदी आहेत.’

– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६० वर्षे), पुणे. (१४.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीचा लाभ करून घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुढे येणार्‍या घोर आपत्काळात वैद्यकीय उपचार मिळणे दुरापास्त होणार आहे’, हे ओळखून मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली आहे. या उपायपद्धतीद्वारे व्याधीग्रस्त व्यक्ती कुणाचेही साहाय्य न घेता स्वतःची व्याधी दूर करण्याचा प्रयत्न करू शकते किंवा उन्नत साधकही अन्य आजारी व्यक्तीसाठी या उपायपद्धतीद्वारे त्याची व्याधी दूर होण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. त्यांच्या या गंभीर आजारपणात आधुनिक वैद्य त्यांच्यावर औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय आणि काही प्रयोगही करवून घेतले. उपायपद्धतीमुळे काय फरक जाणवतो ? याचाही अभ्यास केला. या प्रयोगातून आध्यात्मिक स्तरावर होणारा लाभ साधक आणि समाज यांना शिकता येईल, तसेच या उपचारपद्धतीचे महत्त्वही यातून अधोरेखित होईल, या दृष्टीने ही लेखमाला येथे प्रसिद्ध करत आहोत. – संपादक