गृहनिर्माण संकुलाच्या अध्यक्षांनी दाताने चावा घेत सदस्याचा अंगठा तोडला !

दहिसर (मुंबई) येथील घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – दहिसर येथे एका गृहनिर्माण संकुलाच्या इमारतीतील बैठकीत सदस्य आणि अध्यक्ष यांच्यात वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात सोसायटीचे अध्यक्ष नित्यानंद परिहार यांनी सदस्य आदित्य देसाई यांच्या अंगठ्याचा दाताने चावा घेतला. त्यामुळे अंगठा तुटला. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आदित्य देसाई यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

संपादकीय भूमिका

दिवसेंदिवस मनुष्य अधिकच हिंसक आणि क्रूर होऊन पाशवी वर्तन करत आहे. याला समाजातील नष्ट होणारा संयम आणि नैतिकता कारणीभूत आहे !