|
आगरा (उत्तरप्रदेश) – येथील ताजमहालमध्ये, म्हणजेच तेजोमहालयात दोन हिंदुत्वनिष्ठ तरुणांनी गंगाजल अर्पण केले. यासह ‘ओम’ लिहिलेले स्टिकरही चिकटवले. याचा व्हिडिओही बनवण्यात आला असून त्यात दोन तरुण पाण्याची बाटली घेऊन आत जात असल्याचे दिसत आहे. तरुणांनी मुख्य थडग्याच्या तळघराजवळील बाटलीतून पाणी ओतले. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने दोघांनाही कह्यात घेऊन ताजगंज पोलिसांच्या स्वाधीन केले.
१. हे तरुण अखिल भारत हिंदु महासभेचे कार्यकर्ते असून मथुरेच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष श्याम आणि जिल्हा कार्यालय मंत्री विनेश कुंतल अशी त्यांची नावे आहेत.
२. आगरा शहराचे पोलीस उपायुक्त सूरज राय म्हणाले की, गंगाजल अर्पण केल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास चालू आहे.
३. मथुरेतील अखिल भारतीय हिंदु महासभेच्या जिल्हाध्यक्षा छाया गौतम म्हणाल्या की, ३१ जुलैला मी श्याम आणि विनेश कुंतल या कावड यात्रेकरूंसमवेत गेले होते. २ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता प्रशासनाने मला नजरकैदेत ठेवले; परंतु मी त्यांना फसवून तेथून निघून गेले. सकाळी ७ वाजता ताजमहालला पोचले. तेथे श्याम आणि विनेश यांनी ताजमहालमध्ये गंगाजल अर्पण केले.
४. ५ दिवसांपूर्वीजल हिंदु महासभेच्या मीना राठौर याही अर्पण करण्यासाठी गेल्या होत्या. त्या म्हणाल्या की, ताजमहालमध्ये भगवान शिवाचे मंदिर आहे. जोपर्यंत मी मंदिरात जल अर्पण करत नाही, तोपर्यंत मी येथून जाणार नाही; मात्र पोलिसांनी त्यांना पश्चिमेकडील प्रवेशद्वारावरच रोखले.