भाग्यनगर (तेलंगाणा) – एका खासगी बसमध्ये प्रवास करत असलेल्या महिला प्रवाशावर बसचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय पीडिता तेलंगाणातील निर्मल जिल्ह्यातून प्रकाशमला येथे खासगी स्लीपर बसने जात होती. २९ जुलैच्या मध्यरात्री बस भाग्यनगरला पोचली असतांना पीडित महिलेने ‘१००’ क्रमांकावर संपर्क करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी बस अडवून तपासणी चालू केली असता आरोपी बसचालक पसार झाल्याचे पोलीस अधिकार्याने सांगितले.
Two rape cases spark outrage in Bhagyanagar (Hyderabad)
🛑A Techie was gang-raped by two friends at a hotel in Vanasthalipuram.
🛑A woman was raped by the driver of a sleeper bus going from Sangareddy to Prakasham district
Such lustful people must be punished severely !
Save… pic.twitter.com/8tO1swPCdv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 31, 2024
बसचालकांपैकी एकाने त्याच्या तोंडावर चादर टाकून इतर प्रवासी असतांनाही चालू बसमध्ये महिलेवर बलात्कार केला, असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. त्या वेळी बस चालवत असलेल्या व्यक्तीला कह्यात घेऊन चौकशी केली जात आहे, असे पोलीस अधिकार्याने सांगितले. पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे उस्मानिया विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत ! |