मूडबिद्री (कर्नाटक) – येथे गोमांसाची अवैध वाहतूक करणारे महंमद आरिफ (वय २४ वर्षे) आणि महंमद सुलतान (वय १९ वर्षे ) यांना बझपे पोलिसांनी अटक केली आहे. ते बैतारी येथे वाहनातून गोमांसाची वाहतूक करत होते. बझपे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रेवणसिद्दप्पा हे पोलिसांसह तपासणी करत असतांना आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून अंदाजे २ लाख रुपये किंमतीचे एकूण ७५० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे.