साधे गृहमंत्रीही होऊ शकले नाहीत !
नागपूर – खासदार शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने साहाय्य न केल्याने तडीपार झाले आहे. पंतप्रधान पद तर दूर ते गृहमंत्रीही होऊ शकले नाहीत. केवळ ७ जागांवर त्यांना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचे पुढारी व्हायचे आहे, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २८ जुलै या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
ते म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, आमदार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. राज्य सरकार तर थेट चर्चेस सिद्ध आहे. सरकार मनोज जरांगे आणि ओबीशी नेत्यांशी वारंवार चर्चा करत आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. महाविकास आघाडीने आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही. आता तरी त्यांनी ओबीसीविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करावी.