१. स्वप्नात पू. निर्मला दातेआजींनी आशीर्वाद आणि चैतन्य देऊन कृपा केल्याचे साधिकेला जाणवणे अन् सकाळी जाग आल्यानंतरही तिला ते चैतन्य अनुभवता येणे
‘१.७.२०२४ या दिवशी रात्री मला एक स्वप्न पडले. ‘स्वप्नात पू. निर्मला दातेआजी रामनाथी आश्रमात आहेत’, असे मला दिसले. ‘त्या नेहमी जशा खुर्चीत बसलेल्या असतात, तशाच स्थितीत बसल्या असून थोड्या कृश झाल्या आहेत’, असे मला दिसले. ‘त्यांच्या नेत्रांमधून वात्सल्य प्रक्षेपित होत आहे’, असे दिसले. त्या वेळी त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज जाणवले. ‘त्यांनी स्वप्नातच मला आशीर्वाद दिला, चैतन्य दिले आणि माझ्यावर कृपा केली’, असे मला जाणवले. सकाळी जाग आल्यानंतरही मला चैतन्य अनुभवता येत होते आणि पू. आजींबद्दल कृतज्ञता वाटत होती. तेव्हा मला वाटले, ‘पू. आजींचे कार्य सूक्ष्मातून निर्गुण स्तरावर चालू आहे आणि माझ्यासारख्या अनेक साधकांवर त्या कृपा करत आहेत.’
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेले पू. निर्मला दातेआजींचे छायाचित्र पाहिल्यावर आलेल्या अनुभूती
९.७.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. निर्मला दातेआजींचे छायाचित्र छापून आले आहे. ते पाहून मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. पू. दातेआजींच्या चेहर्याकडे बघून मला पुष्कळ शांत वाटले.
२. त्यांच्या छायाचित्राकडे पहात असतांना मला तेथे प्रकाश दिसू लागला. तेव्हा ‘त्यांच्या देहाच्या ठिकाणी केवळ निर्गुण तत्त्व प्रकाशरूपात आहे’, असे मला जाणवले.
३. त्यांच्या चेहर्याकडे बघून ‘त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी एकरूप होत आहेत आणि त्यांच्या अखंड अनुसंधानात आहेत’, असे मला वाटले.
या अनुभूती दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टर आणि पू. दातेआजी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (९.७.२०२४)
|