गाझीपूर – जिल्ह्यातील देवरिया आणि सब्बलपूर खुर्द गावात असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मंदिरांत चोर्या झाल्या. दोन्ही घटनांमध्ये देवीच्या मूर्तीला अर्पण केलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले.
2 temples of Shri Durga Devi in Gazipur district of Uttar Pradesh burglarized
Hindu temples are currently unsafe in India !#Temple pic.twitter.com/jaMyaFLi0D
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 14, 2024
१. देवरिया गावातील श्री दुर्गादेवीच्या मंदिरात १३ जुलैच्या सकाळी ग्रामस्थ मंदिरात पोचले असता त्यांना मंदिराचे कुलूप तुटलेले दिसले. माहिती मिळताच पुजारी विजेंद्र सिंह यादव घटनास्थळी पोचले. चोरट्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रक्कम चोरली, तसेच देवीचे दागिने चोरल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.
२. सब्बलपूर खुर्द गावात असलेल्या श्री दुर्गादेवी मंदिरातही चोरट्यांनी मूर्तीवरील दागिने चोरून नेले.
३. चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस प्रभारी निरीक्षक अशेषनाथ सिंह यांनी सांगितले की, अन्वेषण चालू असून आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाभारतात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! |