‘हिट अँड रन’च्या वाढत्या घटनांविरोधात विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांची निदर्शने !

विधीमंडळ इमारतीच्या पायर्‍यांवर सरकारच्या विरोधात निदर्शन करतांना विरोधक

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – राज्यातील ‘हिट अँड रन’च्या वाढत्या घटनांविषयी १० जुलै या दिवशी विरोधकांनी विधीमंडळ इमारतीच्या पायर्‍यांवर सरकारच्या विरोधात निदर्शने केली. राज्यातील महिलांची असुरक्षितता, कायदा-सुव्यवस्थेची गंभीर स्थिती यांविषयी शासन गंभीर नाही, असा आरोप विरोधकांनी केला. हातात घोषणा फलक धरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

संपादकीय भूमिका :

वाढत्या ‘हिट अँड रन’च्या घटना पोलिसांसह प्रशासनालाही लज्जास्पद आहेत !