मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांची नावे पालटण्याचा ठराव ९ जुलै या दिवशी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला. मंत्री दादाजी भुसे यांनी हा ठराव मांडल्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा ठराव मतदानाला ठेवला. तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमताने मान्यता दिली. यामध्ये मुंबई सेंट्रलचे नामांतर ‘जगन्नाथ नाना शंकरशेठ टर्मिनस’, करी रोडचे ‘लालबाग’, सॅन्डहर्स्ट रोडचे ‘डोंगरी’, मरीन लाईन्स्चे ‘मुंबादेवी’, चर्नी रोडचे ‘गिरगाव’, डॉकयार्ड रोर्डचे ‘माझगाव’, कॉटन ग्रीनचे ‘काळाचौकी’ आणि किंग्ज सर्कलचे नामांतर ‘तीर्थंकर पार्श्वनाथनगर’ असे करण्यात येणार आहे. हा ठराव कार्यवाहीसाठी केंद्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिका :अत्याचारी ब्रिटिशांनी ठेवलेलेल्या त्यांच्या अस्तित्वाच्या सर्व पाऊलखुणा समयमर्यादा ठेवून पुसणे आवश्यक ! |