
कोल्हापूर – पुरातत्व विभागाच्या वतीने श्री केदारलिंगाच्या म्हणजे श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार होता. श्री जोतिबा देवाची यात्रा १० ऑगस्टला होणार आहे. त्यासाठी पूजार्यांना अगोदरपासून सिद्धता करावी लागते. तरी मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलावे, अशी विनंती जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष यांच्याकडे पुजार्यांनी केली होती. याचा विचार करून श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्री केदारलिंगाच्या (जोतिबादेव) मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे. यामुळे श्री केदारलिंग देवाचे दर्शन नियमितपणे चालू असेल, असे समितीकडून कळवण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !
अजिंक्यतारा आणि संगम माहुली विकासकामांना प्रशासकीय मान्यता ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार