मालगाडीच्या धडकेत १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

भ्रमणभाषच्या अतीवापराचा परिणाम !

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – येथे मालगाडीच्या धडकेत १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तो पायी रेल्वेरुळ ओलांडत होता. त्या वेळी त्याच्या कानात हेडफोन आणि हातात भ्रमणभाष होता. गाडीचा आवाज त्याला ऐकू न आल्याने त्याला मालगाडीची धडक बसली. तो काही अंतरावर रुळांवर ओढला गेला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.