११ दिवसांनंतर होणार पुण्यात आगमन !

आळंदी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत आषाढी वारीला जाण्यासाठी मानकरी शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व शितोळे अंकली (कर्नाटक) येथून आळंदीकडे मार्गस्थ झाले आहेत. वारीत सहभागी होण्यासाठी आळंदीला निघालेल्या मानाच्या अश्वांची बेळगावमधील शितोळे अंकलीमध्ये ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विधीवत् पूजा झाली. त्यानंतर टाळ-मृदंगाचा निनाद अन् माऊलीनामाच्या गजरात या अश्वांना अंकलीकरांनी निरोप दिला. हे अश्व ११ दिवसांचा प्रवास करून २६ जून या दिवशी पुण्यात पोचतील. त्यानंतर २८ जूनला ते आळंदीला पोचणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जून या दिवशी आळंदीतून प्रस्थान होणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
संपादकीय : हिंदू जात्यात !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !