गोड बोलून काटा काढायचा सरकारचा डाव ! – मनोज जरांगे, आंदोलनकर्ते

मनोज जरांगे

जालना – मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी आधुनिक वैद्यांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. ८ जूनपासून त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. ‘मराठा आरक्षणात सगे-सोयर्‍यांची कार्यवाही व्हावी’, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, विनाकारण मराठ्यांना लाडीगोडी लावत असतील, गोड बोलून काटा काढायचे काम चालू असल्याचा अंदाज मला दिसत आहे. सरकार जाणीवपूर्वक डाव खेळत आहे.