कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत तीन शाळा अनधिकृत !

शाळांवर दंडात्मक कारवाईची चेतावणी !

कल्याण : शासनाची अनुमती न घेता चालू केलेल्या कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळा अनधिकृत म्हणून शिक्षण विभागाने घोषित केल्या आहेत. या शाळेत यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले जाईल. तसेच संबंधित शाळांवर दंडात्मक कारवाईची चेतावणी उपायुक्त जाधव यांनी दिली.

संपादकीय भूमिका

अनधिकृत शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !