विद्यार्थी रुग्णालयात भरती; प्रकृती चिंताजनक

ढाका (बांगलादेश) – वंंगबंधू शेख मुजीबूर रहमान विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथे शिकणारा हिंदु विद्यार्थी उत्सब कुमार ज्ञान याच्यावर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याला विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना २६ मे या दिवशी येथे घडली. उत्सब याने सामाजिक माध्यमांतून पैगंबर यांचा अवमान करणारी पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप आहे. त्याला विद्यापिठातून बडतर्फ करण्याची मागणी केली जात आहे.
उत्सब याला मारहाण केल्यानंतर त्याच्याकडून अवमान केल्याचा कबुलीजबाब बलपूर्वक लिहून घेण्यात आला. उत्सब याने तो लिहून दिल्यावर त्याला पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला येथील रुग्णालयात भरती केले. त्याची प्रकृती बरी झाल्यावर त्याची चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकास्वतःच्या धार्मिक भावना दुखावणार्यांच्या विरोधात कायदा हातात घेणारे हिंदूंच्या धार्मिक भावना मात्र सर्रास दुखावत असतात, हे लक्षात घ्या ! |
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी येणार भारताच्या दौर्यावर येणार !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !