राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणवर्गांना आरंभ

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले जाणारे प्रशिक्षणवर्ग या वर्षीपासून नवीन पद्धतीप्रमाणे होणार आहेत. पूर्वी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ग असे वर्ग होत. त्याऐवजी आता संघ शिक्षा वर्ग, कार्यकर्ता विकास वर्ग प्रथम आणि द्वितीय अशा प्रकारे वर्ग होतील. २४ मे या दिवशी प्रांत स्तरावर आयोजित ‘संघ शिक्षा वर्ग-सामान्य’ हा कोकण प्रांताचा वर्ग चिपळूण येथे झाला, तर ‘संघ शिक्षा वर्ग-विशेष (४५ वर्षांवरील कार्यकर्त्यांसाठी) हा वर्ग २२ मे ते ६ जून या कालावधीत नाशिक येथे होईल. कोकण प्रांताचा आणि पश्चिम क्षेत्राचा ‘संघ शिक्षा वर्ग-सामान्य’ वर्ग चालू झाला आहे. पश्चिम क्षेत्राच्या वर्गात ३४३ स्वयंसेवकांचा सहभाग आहे. पहाटे ५ ते रात्री १० या कालावधीत वर्गाचा दिनक्रम असतो. सहभागी स्वयंसेवक वर्गाच्या कालावधीमध्ये भ्रमणभाष बाळगत नाहीत.