पुणे येथे प्रेमसंबंध तोडल्याने फैज खानची तरुणीस धमकी !

पुणे – प्रेमसंबंधातून तरुणी आणि फैज खान यांचा वाद झाला. फैज याने तरुणीला मारहाण करून बघून घेण्याची धमकी दिली. (धर्मांधांचे खरे स्वरूप ! – संपादक) त्यामुळे तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात फैज याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. ही धमकी १० मे या दिवशी दिल्याचे समजते. तक्रारदार आणि आरोपी फैज यांच्यात वर्ष २०२२ पासून प्रेमसंबंध होते. फैज याचे वागणे तक्रारदार तरुणीस आवडत नसल्याने यापूर्वी त्यांच्यात अनेकदा वाद निर्माण झाले होते. १० मे या दिवशी तक्रारदाराने ‘आपल्यातील नाते संपलेले आहे’, असे सांगितल्यानंतर फैज याला राग आल्याने त्याने तरुणीस मारहाण करत बघून घेण्याची धमकी दिली.