स्वतःच्या अल्पवयीन मुलाकडून अश्लील चित्रीकरण करून घेतल्याप्रकरणी महिलेसह प्रियकराविरोधात गुन्हा नोंद !

उरण येथील प्रकार !

उरण (जिल्हा रायगड) – येथे रहाणार्‍या एका महिलेने तिच्या ६ वर्षांच्या मुलाकडून प्रियकरासमवेतचे अश्लील कृत्यांचे चित्रीकरण करून घेतले. या प्रकरणी महिलेसह तिच्या प्रियकराच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांमध्ये गेल्या ३ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यामुळे महिलेचा पती तिला सोडून गेला होता. कालांतराने तिचे प्रियकरासमवेत वाद झाल्याने ती पोलिसांत गेली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कार करणे आणि ठार मारणे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. या वेळी त्याने जामीन मिळवण्यासाठी पनवेल सत्र न्यायालयात महिलेसमवेत प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्यांचा पुरावा म्हणून चित्रीत केलेला व्हिडिओ दाखवला. चौकशीत त्याने हा व्हिडिओ महिलेच्या ६ वर्षांच्या मुलाने चित्रीत केल्याचे सांगितले. अद्याप दोघांना अटक करण्यात आलेली नाही.

संपादकीय भूमिका

आईने आपल्या लहान मुलाकडून असा प्रकार करवून घेणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे ! अशा महिला ‘आई’ या नात्यासाठी कलंकच आहेत ! नीतीमत्ताहीन कृती केल्याप्रकरणी अशांना कठोर शिक्षा व्हायला हवी !