यादगिरी (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाकडून हिंदु युवकाची हत्या !

बेंगळुरू – कर्नाटक राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर धार्मिक दंगली, आक्रमणे, हत्या इत्यादी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरात रामनवमीच्या निमित्ताने भजने लावणार्‍यांवर आक्रमण करण्यात आले. त्यानंतर नेहा हिरेमठ नावाच्या तरुणीची मुसलमान तरुणाने हत्या केली. या घटना ताज्या असतांनाच आता आणखी एका हिंदु युवकाच्या हत्येची बातमी समोर आली आहे. यादगिरी येथे रोटी केंद्राचा सदस्य फयाज याच्यासह ४ जणांनी राकेश (२२ वर्षे) नावाच्या हिंदु युवकाची हत्या केली आहे.

या खुनाची माहिती मिळताच मृत राकेशच्या कुटुंबियांनी आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! या धर्मांधांना कायद्याचा कसलाही भय न राहिल्याने ते मोकाट आहेत. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !