जिहादच्या विरोधात समाज कृतीशील होत असल्याचे उदाहरण म्हणजे हिंदूंनी ठिकठिकाणी काढलेले हिंदु जनआक्रोश मोर्चे !

हिंदु जनआक्रोश मोर्च्यातील प्रमुख मागण्‍या


दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटनांसह ठिकठिकाणी ‘लँड (भूमी) जिहाद’चे अतिक्रमणही विळखा घालत आहे. विविध मोकळे सरकारी भूखंड, फूटपाथ, रस्‍ते, मुख्‍य चौक येथे, तसेच गडकोटांवर झालेली अनधिकृत थडग्‍यांच्‍या आणि दर्ग्यांच्या स्‍वरूपातील अतिक्रमणे, तसेच ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ग्रामीण भाग आणि शहरातील वस्‍त्‍या येथे लालूच दाखवून अन् अंधश्रद्धेच्‍या जोरावर केली जाणारी धर्मांतरे, कसायांकडून होणारी गोतस्‍करी, गोहत्‍या आणि गोमांस विक्री या सर्व विषयांना अनुसरून पुढील प्रमुख ३ मागण्‍या करण्‍यात येत आहेत.

अ. लव्‍ह जिहाद आणि लँड जिहाद यांविरुद्ध कडक कायदा करा.

आ. धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करा.

इ. गोहत्‍येविरुद्ध कायदा केला असला, तरी त्‍याची कार्यवाही नीट होत नसल्‍यामुळे सक्तीने कार्यवाही करावी.

१५ नोव्‍हेंबर २०२२ या दिवशी भयंकर घटना उघडकीस आली. वसईतील श्रद्धा वालकर नावाच्‍या मुलीने तिच्‍यासह ‘लिव्‍ह इन रिलेशनशीप’मध्‍ये रहात असणार्‍या आफताब पूनावाला नावाच्‍या मुलाकडे लग्‍नाचा तगादा लावला; म्‍हणून तिला देहलीमध्‍ये अतिशय निर्दयीपणे आणि थंड डोक्‍याने मारले. तिच्‍या देहाचे ३५ तुकडे करून ते जंगलात टाकले. या घटनेने संपूर्ण हिंदु जनमानस अस्‍वस्‍थ झाले. या घटनेचा निषेध करण्‍यासाठी महाराष्‍ट्रातील जवळपास सर्व शहरांमध्‍ये अन् जिल्‍ह्यांमध्‍ये उत्‍स्‍फूर्तपणे मोठ्या स्‍वरूपाचे मोर्चे निघण्‍यास आरंभ झाला.

१. सुप्‍त संतापाचे रूपांतर झाले विराट जनआक्रोशामध्‍ये !

अशा श्रद्धा वालकर आपल्‍या अवतीभोवती प्रतिदिन बळी पडत आहेत, हे सर्वांना दिसत होते; मात्र त्‍याकडे गांभीर्याने कुणीही बघत नव्‍हते. डोळ्‍यांना अशा अनेक घटना दिसत होत्‍या; पण त्‍यांच्‍या संवेदना मेंदू आणि मन यांच्‍यापर्यंत पोचत नव्‍हत्‍या. श्रद्धा वालकरच्‍या प्रकरणानंतर मात्र मेलेल्‍या आणि बोथट, बोजड झालेल्‍या या संवेदना प्रचंड वेगाने प्रवाहित झाल्‍या. आपल्‍या आजूबाजूला घडलेल्‍या अशा अनेक घटना स्‍मृतीपटलावर दिसू लागल्‍या आणि मनाच्‍या सुप्‍तावस्‍थेत असलेला या वेदना संतापाद्वारे बाहेर येऊ लागल्‍या. समाजातील या सुप्‍त संतापाचे रूपांतर विराट अशा जनआक्रोशामध्‍ये झाले.

२. मोर्च्यांची आवश्यकता का ?

केंद्र सरकारने ‘सीएए’ (नागरिकत्‍व सुधारणा कायदा) लागू केल्‍यानंतर त्‍याच्‍या विरोधात मुसलमान समाजाचे प्रचंड मोठे मोर्चे निघाले. उद्या महाराष्‍ट्रात लव्‍ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या विरोधातील कायदे पारित होतील; पण राष्‍ट्रभक्त आणि जागरूक हिंदु समाजाच्‍या समर्थनाचा प्रचंड रेटा अन् दबाव जर दिसला नाही, तर कदाचित् याची कार्यवाही होऊ शकणार नाही. त्‍यामुळे अशा मोर्च्यांची नितांत आवश्यकता आहे. तसेच सरकार घेत असलेल्‍या चांगल्‍या निर्णयांना प्रचंड जनसमर्थन लाभल्‍यामुळे सरकारचाही आत्‍मविश्वास द्विगुणित होतो.

परभणीच्‍या मूक मोर्चानंतर वेगवेगळ्‍या शहरांमधून आणि जिल्‍ह्यांमधून उत्‍स्‍फूर्तपणे मोर्चे निघत आहेत. या उत्‍स्‍फूर्ततेतही स्‍वयंशिस्‍त आणि सुसूत्रता तोही ‘सकल हिंदु समाज’ म्‍हणूनच बघायला मिळत आहे. वरील सर्व समस्‍यांच्‍या आणि घटनांच्‍या विरोधात हिंदु समाजमनामध्‍ये असलेली अस्‍वस्‍थता, राग आणि चीड मोर्च्यांच्या रूपाने संघटित स्‍वरूपात दिसत आहे. तसेच ‘सर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे करणे) किंवा ‘गझवा ए हिंद’ (इस्‍लामीस्‍तान) यांसारख्‍या घोषणांमुळे, पी.एफ्.आय.सारख्‍या (‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेसारख्‍या) मुसलमान संघटनांनी वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘मुसलमान राष्‍ट्र’ करण्‍याच्‍या केलेल्‍या नियोजनामुळे हिंदु जनमानसामध्‍ये असुरक्षितता वाढत आहे आणि त्‍यामुळेच आपण ‘हिंदु’ म्‍हणून एक झाले पाहिजे, अशी तीव्र भावना हिंदूंमध्‍ये निर्माण होत आहे.  असे सर्व झाले, तरच ही हा जिहाद भारतातून हद्दपार होऊ शकेल !

– श्री. नीलेश भिसे (साभार : साप्‍ताहिक ‘विवेक’, मराठी, ४.२.२०२३)

देशभक्त गुण्यागोविंदाने राहू न शकण्याला कट्टरतावाद्यांच्या वाढत्या कारवाया आणि त्यांचे होणारे तुष्टीकरण हेच घटक कारणीभूत !  यामुळे जिहाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणे हेच यावरील उत्तर होय !