कीव्ह/मॉस्को – रशियाने नुकतेच युक्रेनमधील चेर्निहाइव्ह येथे ३ क्षेपणास्त्रे डागली. या आक्रमणात १७ जण ठार, तर ६१ जण घायाळ झाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लाडिमिर झेलेन्स्की यांनी या आक्रमणाची माहिती दिली आहे.
१. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात ते म्हणाले, ‘‘जर युक्रेनकडे पुरेशी हवाई संरक्षण उपकरणे असती, तर अशी आक्रमणे झाली नसती. आतंकवादी सामान्य लोकांना तेव्हाच मारतात, जेव्हा त्यांना वाटते की, कुणी तरी त्यांना रोखण्यात यशस्वी होत आहे आणि त्यांचा सामाना करण्यासाठी सदैव सिद्ध आहे.’’
२. जेव्हा रशिया-युक्रेन युद्धास आरंभ झाला, त्या वेळी रशियाच्या सैनिकांनी चेर्निहाइव्ह शहराला चारही बाजूंनी घेरले होते. त्यानंतर युक्रेनच्या वायूसेनेने रशियाच्या सैनिकांना येथून हाकलून लावलेले होते. त्यानंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर हे शहर सोडून गेलेले नागरिक परतले होते.
३. चेर्निहाइव्ह युक्रेनची राजधानी कीव्हपासून १५० किलोमीटरच्या अंतरावर आहे.