शास्त्रीयदृष्ट्या बघितले तर आपल्याला असे लक्षात येईल की, मांसाहार करणार्या प्राण्यांची शरीर रचना भिन्न आहे. मनुष्याची शरीर रचना ही शाकाहारी प्राण्यांसारखी आहे. उदाहरणार्थ घोडा, गाय, बैल, म्हैस, हत्ती, जिराफ हे शाकाहारी आहेत. गवत, झाडांचा पालापाचोळा आणि घरगुती पदार्थ ते खातात. त्यांच्या दातांची रचना आणि मनुष्याच्या दातांची रचना सारखी आहे. वाघ, सिंह यांच्यासारख्या प्राण्यांचा जबडा उघडून बघितला, तर लक्षात येईल की, त्यांना अणकुचीदार सुळे असतात. ज्यांचा उपयोग ते भक्ष्य पकडण्यासाठी आणि चिरफाड करण्यासाठी मुख्यतः करतात.
याचसमवेत अजून एक उदाहरण देता येईल. मांसाहार घेणार्या प्राण्यांचे लहान आतडे, मोठे आतडे आणि त्यांच्या पचनेंद्रियांची रचना ही वेगळ्या पद्धतीने केलेली असते, तर मानवाची अन् शाकाहारी प्राण्यांची रचना सारखी असते. एवढेच काय, तर प्राण्यांची साधे पाणी पिण्याची पद्धतही वेगवेगळी आहे.
– एक धर्मप्रेमी