काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये केला प्रवेश !
नवी देहली – काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असून आता पक्षात रहाण्यात अर्थ वाटत नाही. मी सनातन धर्मविरोधी घोषणा देऊ शकत नाही, तसेच देशाची संपत्ती वाढवणार्या उद्योगपतींना शिव्याही घालू शकत नाही. त्यामुळे मी काँग्रेसची प्राथमिक सदस्यता आणि सर्व पदांचे त्यागपत्र देत आहे.
कांग्रेस पार्टी आज जिस प्रकार से दिशाहीन होकर आगे बढ़ रही है,उसमें मैं ख़ुद को सहज महसूस नहीं कर पा रहा.मैं ना तो सनातन विरोधी नारे लगा सकता हूं और ना ही सुबह-शाम देश के वेल्थ क्रिएटर्स को गाली दे सकता.इसलिए मैं कांग्रेस पार्टी के सभी पदों व प्राथमिक सदस्यता से इस्तीफ़ा दे रहाहूं pic.twitter.com/Xp9nFO80I6
— Prof. Gourav Vallabh (@GouravVallabh) April 4, 2024
प्रा. वल्लभ पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलतांना म्हणाले की, सनातन धर्माच्या विरोधात जेव्हा काँग्रेस पक्षाचे नेते बोलत होते, तेव्हाच मी अस्वस्थ झालो होतो. श्रीराममंदिराच्या लोकार्पणाच्या वेळीही पक्षाने जी भूमिका घेतली, ती मला रुचली नाही. सध्या काँग्रेसची वाटचाल चुकीच्या दिशेने चालू आहे. एकाबाजूला ते जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता असल्याचे बोलतात, दुसर्या बाजूला ते संपूर्ण हिंदु समाजाला विरोध करतात. अशा प्रकारची कार्यपद्धत जनतेमध्ये चुकीचा संदेश देते. हा पक्ष केवळ काही धर्मांना पाठिंबा देत असल्याचा संदेश जात आहे. हे काँग्रेसच्या मूळ विचारधारेच्या विरोधात आहे.