सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील लादीच्या संदर्भात केलेल्या प्रयोगाच्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे !

श्री. प्रताप कापडिया

‘एकदा आम्हा काही साधकांकडून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या निवासाच्या खोलीच्या बाजूच्या खोलीतील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या निवासाच्या खोलीतील लादीवरून चालतांना काय जाणवते ?’, याविषयीचा प्रयोग करून घेण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या निवासाच्या खोलीच्या बाजूच्या खोलीतील लादीपेक्षा त्यांच्या खोलीतील लादीवरून चालतांना लादीचा स्पर्श अधिक मऊ जाणवत होता.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या निवासाच्या खोलीतील लादीवरून चालतांना ‘समुद्रकिनार्‍यावरील मऊ रेतीवरून चालत आहोत’, असे मला वाटत होते.’

– श्री. प्रताप कापडिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७५ वर्षे), फोंडा, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक