आरोपीने भ्रमणभाष करून बोलावले !

मुंबई – इन्स्टाग्रामवर ओळख करून नेपाळमधील १५ वर्षांच्या मुलीला येथील २२ वर्षांच्या एका मुलाने मुंबईत येण्यास भाग पाडले. मुंब्रा येथे खोली भाड्याने घेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला दिवा स्थानकात सोडून दिले. दादर लोकलगाडीत प्रवाशांना ही भेदरलेली मुलगी दिसल्यावर त्यांनी तिची चौकशी करून तिला दादर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तिला रुग्णालयात उपचारांसाठी भरती केले आहे.
आरोपीने ‘तिच्याशी लग्न करीन’, असे आश्वासन देऊन ‘तू मुंबईला न आल्यास मी माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईन’, अशी धमकी दिली होती. आरोपीच्या शब्दांवर विश्वास ठेवून अल्पवयीन मुलीने पालकांना न सांगता नेपाळ सोडले आणि गोरखपूरमार्गे ती मुंबईजवळ कल्याण येथे १९ मार्च या दिवशी आली. नंतर आरोपी तिला मुंब्रा येथे घेऊन गेला.
आरोपी वडाळा येथे रहाणारा आहे. त्याने पीडितेचा भ्रमणभाष काढून घेतला होता. त्यातील दोघांचे सर्व संभाषणही आणि इन्स्टाग्राम खातेही काढून टाकले. मुलीला आरोपीचा भ्रमणभाष क्रमांक पाठ असल्याने त्यावरून पोलिसांनी काही घंट्यांत त्याला अटक केली. पुढील अन्वेषण मुंब्रा पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिका
|
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
संपादकीय : अवघ्या पावणे दोन मासांत शिक्षा !
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !