नवी देहली – सैन्याचे गणवेश विकणार्या एका तरुणाला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आनंदराज सिंह (वय २२) असे त्याचे नाव असून तो राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सैन्याचे गणवेश विकण्याचा व्यवसाय करत होता. त्याचे गंगानगर जिल्ह्यातील ‘सूरतगड आर्मी कॅन्टोन्मेंट’च्या बाहेर सैन्याच्या गणवेशाचे दुकान आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो सामाजिक माध्यमांद्वारे आय.एस्.आय. या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या ३ महिलांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली. त्याने या ३ महिलांना सैन्याची महत्त्वाची माहिती पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
Military uniforms seller turns out to be Pakistan's spy
👉 Such traitors should be declared as terrorists. Their properties should be seized and they should be put to life imprisonment so that no one would ever dare to be involved against the nation#Pakistan pic.twitter.com/jlPs8fKo8G
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 16, 2024
संपादकीय भूमिका
|